पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वत:ला आहे तसं स्वीकारा, सोनालीची प्रेरणादायी पोस्ट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी हिनं सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी लिहिली आहे. सोनालीनं 'नो मेकअप आणि नो फिल्टर फोटो' शेअर केला आहे. 

Family : एकाही कलाकारानं घराबाहेर न पडता असा चित्रीत केला लघुपट

'ही मी आहे, कदाचित ऑनस्क्रीन दिसणाऱ्या परफेक्ट अप्सरेसारखी ही नाही. तरीसुद्धा मी स्वत:वर खूप प्रेम करते. माझी त्वचा जन्मत:च नितळ होती. मात्र नटरंग या चित्रपटानंतर मला मुरुमांचा त्रास जाणवू लागला. अनेक मुलींना हा त्रास जाणवतो. त्यामुळे मी अनेक ऑफर्ससुद्धा गमावल्या. मी नैराश्याच्या गर्तेत अडकले होते. 
पण जेव्हा तुम्ही स्वत:ला जसे आहात तसे स्वीकारता, तेव्हा तुम्ही या समस्यांवर नक्कीच विजय मिळवता. तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ठीक आहे. ते नाही लपवले तरी ठीक आहे. फक्त स्वत:वर प्रेम करायला शिका’, अशी पोस्ट लिहित तिनं चाहत्यांना प्रेरणा दिली आहे.

बॉलिवूड निर्मात्याच्या मुलींना कोरोना

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I don’t sweat 💦 I sparkle ❇️ .... Here’s my #postworkoutselfie with absolutely #nomakeup #nofilter #noedit ON 🤘🏻 Totally #raw and #realme 🤗 I’m one of the #girlswithfreckles Not your perfect ON-SCREEN #APSARA Yet, I absolutely love #myself my #imperfectbeauty I was born with a flawless skin. Right after #Natarang I started to have a huge acne problem, like any other girl. Went through a lot of pain, trauma and rejection. Lost some film offers. Went through a phase of depression and frustration. And then I realised as soon as you start accepting yourself, you start winning over your problems. it’s time we should get over it!!! It’s OKAY to have scars and blemishes and it’s absolutely OKAY not to hide them sometimes!!!!!!! Just embrace yourself. Love yourself. Be grateful for what you’ve got. Here’s me showing #gratitude for all I have today! #selflove #sweatingitout #socialdistancing #stayhome #homequarantine #sundayspecial P.S. What’s your biggest problem & you’ve fought & overcome it? #letschallenge our inner strength!

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

तुम्हाला अनेक अडचणी येतील मात्र त्या अडचणींना सामोरे जा असंही सोनालीनं लिहिलं आहे. गेल्याच आठवड्यात सोनालीनं कोरोना विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतही देऊ केली होती.