पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कापलेली झाडे पुन्हा लावणार का ?, अभिनेत्री सईचा हल्लाबोल

आरे वृक्ष तोडीला सईचा विरोध

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. आरेतील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी, नागरिक, राजकारणी, सेलिब्रिटींचा तीव्र विरोध होत आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं देखील वृक्षतोडीचा  तीव्र निषेध केला आहे. 

ही कसली प्रगती?, अभिनेत्रीचा मुंबईकरांना सवाल

झाडांची कत्तल केल्यानंतर त्याचे परिणाम आपल्यावर देखील होणार, याचा इशारा सईनं ट्विटद्वारे दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर रात्रीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. जवळपास ४०० झाडांची कत्तल करण्यात आल्याची  माहिती आहे. ही झाडं पुन्हा लावणार का अशा संतप्त सवालही तिनं  केला आहे. 

सईबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी  आरेतील कत्तलीचा विरोध केला आहे. रातोरात झाडांची कत्तल करणं हा घृणास्पद प्रकार आहे असं करून आपण खूप मोठी चूक केलीय हे करणाऱ्याला  देखील ठावूक आहे अशा शब्दात फरहान अख्तरनं नाराजी व्यक्त केली आहे. युएनची सद्भवाना दूत असलेली आणि पर्यावरणप्रेमी अभिनेत्री दिया मिर्झानंही या कत्तलीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. '४०० वृक्ष रातोरात तोडण्यात आले. ही कत्तल रोखण्यासाठी सारे  नागरिक एकत्र आले. पर्यावरणाप्रती असलेल्या प्रेमामुळे सारेजण एकत्र आलेत ही एकी तुम्हाला दिसत नाही का? पर्यावरणाचा ऱ्हास होतोय यावर ठोस उपाय करायलाच हवा', अशी कळकळही तिनं व्यक्त केली आहे.

Video : सेटवर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला अक्षयनं वाचवलं

राजकीय पक्षांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, केवळ सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिल्यास अडचण होऊ नये म्हणून एका रात्रीत झाडे तोडण्यात आल्याचे म्हटले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे कृत्य भ्याडपणाचे असल्याचे म्हटले आहे. या कृतीचा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून तीव्र निषेध केला आहे.