पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कौतुकास्पद! सोनालीनंतर अमृताकडूनही मदतनिधी जाहीर

अमृता खानविलकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं दोन दिवसांपूर्वी मदतनिधी जाहीर केला. सोनालीनंतर अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं देखील मदतनिधी जाहीर केला आहे. 

कोरोनाशी लढा : आतापर्यंत 'या' कलाकारांनी देशासाठी केली सढळहस्ते मदत

अमृतानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम देऊ केली आहे. मात्र तिनंदेखील इतर कलाकारांप्रमाणे मदतीचा आकडा जाहीर न करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी तिचे आभार मानले आहेत. तसेच इतरांनादेखील तिनं मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर विकी कौशल, अनुष्का शर्मा,  आलिया भट्ट, राजकुमार राव, सारा अली खान यांसारख्या कलाकारांनीदेखील मदत निधी देऊ केला आहे.

गायिका कनिकाची प्रकृती स्थिर, पाचव्यांदा देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्हच

अक्षय कुमारनं २५ कोटींचा निधी दिला आहे तर सलमाननं २५ हजार रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचं ठरवलं आहे.