अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या मालदिवमध्ये सुट्ट्या व्यतीत करत आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच अमृतानं हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अमृता सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. अमृतानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधल्या बोल्ड अंदाजानं अमृतानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.
अमृतासोबत अभिनेत्री सोनाली खरेदेखील मालदीवमध्ये सुट्ट्या व्यतीत करत आहे. अमृता आणि सोनालीनं मालदीवमधल्या धम्माल सुट्ट्याचे फोटो शेअर केले आहेत.
सध्या मालदीव हे बॉलिवूडमधल्या बहुतेक सर्वच कलाकारांसाठी आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन ठरत आहेत. मालदीवमधले स्वच्छ किनारे, इथलं शांत आणि निसर्गरम्य वातावरण सर्वांनाच भुरळ घालत आहे. अशा निसर्गसौंदर्यानं नटलेल्या मालदीवनं मराठी अभिनेत्रींनाही भुरळ घातली तर आश्चर्य वाटायला नको.