पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

थिएटरमध्ये मोबाईल ड्रामा! 'आणि.. सुबोध भावे संतापला..'

सुबोध भावे

‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून मराठी रंगभूमीची गाथा सांगणाऱ्या अभिनेता सुबोध भावेनं नाटकात काम करणं थांबवायलै हवं, असे संतप्त मत व्यक्त केले.  त्याने फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केल्यानंतर नाटक पाहण्यासाठी आल्यानंतर मोबाईलमध्ये डोकं घालून बसणाऱ्या प्रेक्षकांच्या डोक्यात काही प्रकाश पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नाटक सुरु असताना प्रेक्षक मोबाईलमध्ये गुंग असतात. प्रयोगादरम्यान पुन्हा पुन्हा हा अनुभव येत असल्यामुळे सुबोध भावेनं रंगभूमी सोडावे वाटते, असे मत मांडत प्रेक्षकांनी 'सु' बोध घ्यावा, अशी पोस्ट लिहिली आहे.  

सुबोध भावेनं फेसबुक पोस्टमध्ये लिहलंय की, अनेक वेळा विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे. प्रेक्षकांना नाटक संपूर्ण एकरूप होऊन पाहण्याची गरज वाटत नाही. आता वारंवार सांगण्यापेक्षा पुढे नाटकात काम न केलेलं बरं.... प्रेक्षकांना उद्देशुन सुबोधनं पुढे लिहलंय की, म्हणजे फोनच्यामध्ये आमची लुडबुड नको. फोन जास्त महत्वाचा आहे. नाटक टीव्हीवरही पाहता येईल.

खरंतर सुबोधची ही पोस्ट प्रेक्षकांना बोध देणारी अशी आहे. प्रेक्षकांच्या मनातं उतरण्यासाठी कलाकार अपार मेहनत घेत असतो. रंगमंचावर उभे राहून तो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्न करण्यासाठी त्याची खटाटोप करत असतो. मात्र मोबाईलच्या जगात जगणारा सध्याचा प्रेक्षकवर्ग बऱ्याचदा हे त्याचे कष्ट विसरुन जातो. त्यामुळे सबोध सारख्या कलाकाराच्या भावना दुखावणे स्वाभाविक आहे.