पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतिदिन विशेष : ..अचानक नियतीचे फासे उलटे पडले

दिवंगत अभिनेता अक्षय पेंडसे

काही कलाकारांची कारकीर्द छोटी असली तरी त्यांच्या उत्तमोत्तम भूमिकांमुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात रहातात. तसाच एक अप्रतिम अभिनेता म्हणजे अक्षय पेंडसे. १२ नोव्हेंबर १९७९ रोजी त्याचा जन्म झाला.

त्याचं शालेय शिक्षण पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयात झालं. नंतर त्यानी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून एम. ए. पदवी मिळवली. पुढे अभिनयक्षेत्रात जम बसवण्यासाठी तो मुंबईला गेला. स्पष्ट शब्दोच्चार, सहज सुंदर अभिनय आणि देखणा चेहरा या सर्व गुणांचं जन्मजात वरदान लाभलं असल्याने त्याला अमोल पालेकर यांच्या 'कैरी' या लघुपटात एक सुरेख भूमिका मिळाली आणि त्यानेही ती तितकीच सुंदर साकारली. नंतर 'ध्यासपर्व', 'उत्तरायण', 'कायद्याचं बोला' अशा अनेक चित्रपटांमधे त्याने अप्रतिम भुमिका केल्या. 

स्मृतिदिन विशेष : 'आनंदयात्री सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला'

'माझ्या वाटणीचे खरेखुरे', 'सिगारेट्स', 'सेलिब्रेशन' अशा अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये तर 'मिस्टर नामदेव म्हणे', 'खरं सांगायचं तर', 'सासू माझी ढाँसू' अशा व्यावसायिक नाटकांमधेही त्याने काम केलं. 'मला सासू हवी', कस्तुरी', 'भाग्यलक्ष्मी', 'वादळवाट' या मालिकांमधेही त्याने लक्षवेधी भूमिका केल्या. त्याची कारकीर्द छान फुलत असतानाच अचानक नियतीचे फासे उलटे पडले आणि त्याच्या कारकिर्दीला दुर्दैवाने २३ डिसेंबर २०१२ रोजी पूर्णविराम मिळाला. पण त्याच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे तो चिरकाल सर्वांच्या स्मरणात राहील. अशा या अप्रतिम कलाकाराला मानाचा मुजरा...

स्मृतिदिन : भूमिकेशी समरसून काम करणारा असामान्य कलाकार