धारावीत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा शुक्रवार दिवसाअखेरपर्यंत १०१ वर पोहोचला. मुंबईतल्या अत्यंत दाटीवाटीच्या या वस्तीत कोरोनाला आळा घालण्याची मोठी जबाबदारी स्थानिक प्रशासनावर आहे. या संकटाशी लढण्याकरता धारावीतल्या रहिवाशांना बळ मिळो अशी प्रार्थना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं केली आहे.
कॅन्सरमधून बचावलेल्या रवी जाधवच्या मुलाला वाढदिवशी मिळाली खास भेट
दोन महिन्यांपूर्वी याच दिवशी एका चित्रीकरणासाठी प्राजक्ता ही धारावीत गेली होती. या चित्रीकरणाचा फोटो प्राजक्तानं शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. याच तारखेला दोन महिन्यांपूर्वी मी धारावीत चित्रीकरणासाठी गेले होते, मी इथल्या लोकांशी संवाद साधला, त्यांचं राहणीमान जवळून पाहिलं. आज संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे, मात्र धारावील्या लोकांसमोर मोठ्या अडचणी आहेत पण विश्वास ठेवा, या संकटाला धीरानं सामोरं जा, आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू अशी पोस्ट प्राजक्तानं लिहिली आहे.
१ एप्रिलला धारावीत पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. धारावीत जे हाय रिस्क लोक आहेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर लो रिस्क लोकांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ११ एप्रिलपर्यंत धारावीत कोरोनाचे २८ रुग्ण समोर आले तर १६ एप्रिलपर्यंत हा आकडा ८६ वर पोहोचला होता.
कंगनाची बहीण द्वेष पसरवते, ट्विटर बंद केल्याचं डिझायनरकडून समर्थन