पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Review : द फॅमिली मॅन

द फॅमिली मॅन

द फॅमिली मॅन

लेखक-दिग्दर्शक: कृष्णा डीके आणि राज निडीमोरू

संवाद : सुमीत अरोरा

मुख्य कलाकार : मनोज वाजपेयी, प्रियमणी, शबीर हाश्मी 
 

साधारणपणे चाळीशी उलटलेला तो, संसाराला पंधरा वर्षं झालेली. सुंदर बायको, वयात येऊ लागलेली मुलगी आणि बंडखोर लहान मुलगा अशा दोन मुलांचा बाप. कुटुंबासह तो एका टू बीएचके फ्लॅटमध्ये राहतोय. घर लहान म्हणून त्याची आई त्यांच्यासोबत राहत नाहीये. होम लोन सँक्शन झाल्यावर मोठा फ्लॅट घेऊन त्याला आईला स्वत:च्या घरी आणायचंय खरंतर. बरीच वर्षं वापरून जुनी झालेली गाडी काढून टाकून नवी एसी कार घ्यावी अशी त्याच्या मुलांची इच्छा आहे. सख्खी भावंडं, आई, बायको, मुलं यांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली आहे तो. सगळ्यांनाच वाटतंय की तो करतोय ती नोकरी करण्यापेक्षा वेगळं, भारीपैकी आणि लठ्ठ पगार देणारं करिअर त्यानं करायला हवं होतं. या सरकारी नोकरीत त्याची हुशारी, प्रखर बुद्धिमत्ता वाया चालली आहे. तुटपुंजा पगार, कुटुंबाच्या मागण्या, मुलांचे प्रश्न, घर-मुलं-कॉलेजमधली नाविन्य संपलेली नोकरी करुन कंटाळलेली आणि दुरावत चाललेली सुंदर बायको...या सगळ्या आवर्तात तो गुरफटला आहे. पण जेव्हा काम समोर येतं तेव्हा मात्र तो मनातला गोंधळ बाजूला सारून आपलं कर्तव्य चोख बजावतो. हा आहे, श्रीकांत तिवारी, मुंबईस्थित 'टास्क' नावाच्या एका काल्पनिक सरकारी गुप्तहेर संस्थेचा वरिष्ठ अधिकारी. अमेझॉन प्राइमवर नुकत्याच रिलीज झालेल्या ’द फॅमिली मॅन’ या अतिशय उत्कंठापूर्ण वेबसीरिजने प्रेक्षकांची मनं केव्हाच जिंकून घेतली आहेत..त्याला कारणंही तशीच तगडी आहेत.

सोनाक्षी म्हणजे 'धन पशू', मंत्र्याची टीका

मनोज वाजपेयी हा उत्कृष्ट अभिनेता शीर्षक भूमिकेत आहे. त्याने या भूमिकेचं सोनं केलं आहे. तो श्रीकांतच वाटतो. ब त्याच्या  देशप्रेमाची प्रखर जाणीव, कर्तव्यबुद्धी, सारासर विवेक, जबाबदारी न टाळता घेतल्या निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची वृत्ती...तिवारीच्या पात्रातले एकूणएक कंगोरे मनोज वाजपेयी आपल्याला मस्त दाखवतो. तीच गोष्ट त्याच्या बायकोची, सुचित्रा उर्फ सुचिची भूमिका करणाऱ्या प्रियमणी या दाक्षिणात्य अभिनेत्रीची. इतक्या सहज सुंदरतेने तिनी सुचि साकारली आहे की बास..! याशिवाय कमाल करतो तिसऱ्या मुख्य भुमिकेतला शरीब हाश्मी, त्याने साकारलेलं जेके तळपदे हे पात्र धमाल करतं. हा तळपदे श्रीकांतचा कलीग आहे. अनेक वर्षं एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. तो वय वाढूनही सडाफटिंगच आहे. त्याच्या तोंडी असलेले, Privacy is a myth, just like democracy..! असे संवाद धमाल आणतात.

तुमची हिंमत कशी झाली? १६ वर्षांच्या कार्यकर्तीचा नेत्यांना सवाल

 आजवर आपण कथा-कादंबऱ्या-सिनेमांमधून पाहिलेल्या गुप्तहेरांच्या गूढ जगाची कौटुंबिक बाजू या मालिकेतून आपल्यापुढे फारच प्रभावी पद्धतीने येते. हे सुपर स्पाय काय खातात-पितात? कुठल्या मिशनवर नसतात तेव्हा कोणते कपडे घालतात? कसे जगतात? त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कामाची कल्पना असते का? अशा अनेको प्रश्नांची उत्तरं आपल्याला या मलिकेतून मिळतात. अचूक पात्रनिवड, वास्तविक बातम्यांवर आधारित बेतलेलं भनाट कथानक, खिळवून ठेवणारे संवाद, सहज ओघवती भाषा (भरपूर शिव्यांचा भडिमार असला तरीही तो योग्यच वाटतो.) रोजच्या पाहण्यातलं मुंबई शहर या मालिकेत वेगळंच दिसतं. कृष्णा डीके आणि राज निडीमोरू या लेखकद्वयीने या मालिकेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घटनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. २००२ मध्ये घडलेल्या गोध्राच्या दंगलीचे संदर्भ थेट केरळमधे सापडलेल्या इसिस या पाकिस्तानी संघटनेची पाळंमुळं.काश्मिरपर्यंत आपल्याला मालिकेत दिसतात. सुमीत अरोरा या संवादलेखकानं मलिकेत अक्षरश: जान ओतली आहे. प्रत्येक प्रसंग, पात्रांमधले संवाद कुठेही प्रचारकी, उपदेश करणारे न वाटता ’तुमच्याआमच्यातले’ वाटतात. संवादात असलेला सहज विनोद प्रसंगातली विसंगती छानच पोहोचवतो. या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पात्राची मानवी बाजू जास्त ठळक केलेली इथे दिसते. मग तो नायक असो वा खलनायक.

'२.०' फेम अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनला पुत्ररत्न

एकूणातच ’आवर्जून बाघावे असे काही’ या श्रेणीतली ही वेब सीरिज आहे, एवढं नक्की!

- प्राची कुलकर्णी-गरुड
prachihere@gmail.com