पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पोंनियिन सेलवन' या ऐतिहासिक पटाचं सर्वाधिक चित्रीकरण थाडलंडमध्ये

मणिरत्नम्

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या महत्वाकांक्षी चित्रपट  'पोंनियिन सेलवन' च्या चित्रीकरणाला पुढील महिन्यापासून सुरूवात होत आहे. या चित्रपटाचं सर्वाधिक चित्रीकरण हे थायलंडमध्ये होणार आहे. त्यादृष्टीनं मणिरत्नम् आणि स्टंट दिग्दर्शक श्याम कौशल यांनी जागेचा शोध  घेण्यास सुरुवात केली आहे. 

'तान्हाजी'मध्ये हा मराठी अभिनेता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

हे दोघंही चित्रपटासाठी योग्य अशा ठिकाणाचा शोध घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटाची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. डिसेंबर महिन्यात अखेर या चित्रपटाला सुरूवात होणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, जयम रवी, कार्ती, किर्ती सुरेश, अमला पॉल यांसारखे अनेक कलाकार  चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

प्रभासची जादू जपानमध्येही, पदार्थांच्या पॅकेजवरही फोटो

युवा राजकुमार अरुल्मोज्हिवर्मन जो चोल साम्राज्याचा महान सम्राट म्हणून ओळखला  जातो  या सम्राटाच्या जीवनावर  पोंनियिन सेलवन आधारलेला आहे. हा चित्रपट कलकी लिखीत प्रसिद्ध कांदबरी पोंनियिन सेलवनपासून प्रेरित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे, ऐश्वर्या या चित्रपटात चोल साम्राज्याचे  खजिनदार पेरिया पज्हवेत्तुरायर यांच्या पत्नी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

लतादीदी लवकर बऱ्या व्हा; राज ठाकरेंची प्रार्थना

सत्तेसाठी आसुसलेली स्त्री  पतीला कटकारस्थानात सहभागी करून चोल  वंशाच्या  पतनाची शप्पथ घेते. भूतकाळात याच वंशामुळे सहन कराव्या लागलेल्या मानहानीचा  प्रतिशोध ती  घेते तिच्या प्रतिशोधाची, हट्टाची, लालसेची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
दहाव्या शतकातील चोल साम्राज्याचा सेट उभारण्यासाठी कारागिर कित्येक महिन्यांपासून मेहनत घेत आहेत.