पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मणिरत्नम् यांची प्रकृती ठिक, कामावर रूजू

मणिरत्नम्

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम् यांची प्रकृती ठिक असून ते आता कामावरही रुजू झाले आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं त्यांच्या कार्यालयातील प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. मणिरत्नम् यांना हृदयाशी संबधीत त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांची प्रकृती ही ठिक नसल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातून  स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

ते केवळ रुटीन चेकअप होते. ते सोमवारी कार्यालयात आले होते. त्यांची प्रकृती ठिक असून काळजी करण्याचं काहीच कारण नसल्याचं त्याचे  सहकारी निखील म्हणाले.  काहीवर्षांपूर्वी  मणी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत होते. मात्र त्यांची प्रकृती ठिक असल्याचं आता म्हटलं जात आहे. 

मणीरत्नम् हे त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपट पोनियिन सेल्वम या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहेत. सध्या चित्रपटाचा भव्य दिव्य सेट उभारण्याचं काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या  चित्रीकरणास सुरूवात होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या खलनायिकेच्या भूमिकेत आहे.