पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चित्रीकरणासाठी Man Vs Wild च्या टीमनं भरले इतके शुल्क

मॅन वर्सेस वाईल्ड

डिस्कव्हरी चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'मॅन वर्सेस वाईल्ड' या शोची संपूर्ण टीम सध्या भारतात आहे. कर्नाटकातील बांदीपुरा व्याघ्र अभयारण्यात या सुप्रसिद्ध शोचं चित्रीकरण सुरु आहे. २८ ते ३० जानेवारीदरम्यान बांदीपुराच्या जंगलात चित्रीकरण पार पडणार आहे. यासाठी दिवसातील  काही तासांची वेळ शोच्या टीमला देण्यात आली आहे. 

VIDEO : रिंकूसाठी नेहा कक्करनं पहिल्यांदाच गायलं मराठीत गाणे

डिस्कव्हरीच्या टीमला आम्ही चित्रीकरणासाठी सहा ते आठ तास दिले आहेत असं बांदीपुरा व्याघ्र अभयारण्याचे संचालक टी भालचंद्र म्हणाले. 'पहिल्या दिवशी ११ वाजता चित्रीकरणाला सुरुवात झाली तर सायंकाळी ४ च्या सुमारास चित्रीकरण संपलं. नियमाप्रमाणे डिस्कव्हरीनं पैसे भरले आहे. त्यांना प्रत्येक दिवशी जंगलातील चित्रीकरणासाठी शुल्क भरावे लागणार आहे. याव्यतिरिक्त गाडी भाडे आणि इतर शुल्कही टीमनं भरलं आहे.' एकूण चार दिवसांच्या चित्रीकरणासाठी १० लाखांचं  शुल्क टीमनं भरलं असल्याची माहिती टी भालचंद्र यांनी दिली आहे. 

PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?

'मॅन वर्सेस वाईल्ड' च्या विशेष चित्रीकरणासाठी बेयर ग्रिल्स २८ जानेवारीला  भारतात आला . याच दिवशी रजनीकांत यांनी विशेष भागाचं चित्रीकरण केलं. पाच तास हे चित्रीकरण सुरु होतं.