पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चार वर्षांनी ‘डॅडी’ दगडी चाळीत, 'दगडी चाळ २' ची घोषणा

दगडी चाळ २

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करायला सुरुवात केली. 

मराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज

मात्र काही वेळानं अरुण गवळी यांची भूमिका साकारलेले अभिनेते मकरंद देशपांडे असल्याचं लक्षात येताच लोकांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. चार वर्षांपूर्वी आलेल्या 'दगडी चाळ' चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी  'डॅडी' म्हणजेच अरुण गवळींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचा  'चुकीला माफी नाही' हा डायलॉग तर हिटच झाला होता. आता लवकरच 'दगडी चाळ २' येत आहे. 'दगडी चाळ २' मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.

कतरिनाच्या जागी स्वत:ची निवड केल्याबद्दल श्रद्धा म्हणते... 

मकरंद यांनी दगडी चाळीत जाऊन संगीता अहिर मुव्हीजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.