पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गर्ल्स' आणि 'फत्तेशिकस्त' मधली टक्कर टळली

गर्ल्स- फत्तेशिकस्त मधली टक्कर टळली

एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित झाले की दोन्ही चित्रपटाच्या कमाईला याचा हमखास फटका बसतो. यापूर्वी कमाईवर परिणाम होऊ नये  यासाठी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता मराठीतही हिच पद्धत रुढ होऊ लागली आहे. 

१५ नोव्हेंबरला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार होते.  मात्र आता 'गर्ल्स'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी परस्पर समन्वयाने एका चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा 'गर्ल्स' आता २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेवर रानू म्हणतात..

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा मागीलवर्षी हिट ठरलेल्या 'फर्जंद' या चित्रपटाचा पुढील भाग आहे. तर 'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा तरुणाईला आकर्षित करणारा 'गर्ल्स' हा तिसरा चित्रपट येत आहे.  दोन्ही चित्रपटांच्या टीमने अथक परिश्रम करून चित्रपट तयार केला आहे आणि एकाच दिवशी हे चित्रपट प्रदर्शित झाले तर त्याच्या फटका दोन्ही चित्रपटांना बसेल, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रीक्वल येणार, अनेक गुपिते उलगडणार

 या निर्णयाबाबत 'गर्ल्स'चे निर्माता नरेन कुमार म्हणाले, '' हे दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत आणि या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आम्हाला वाटते. 'गर्ल्स' हा एक निखळ मनोरंजनात्मक चित्रपट आहे तर 'फत्तेशिकस्त' हा ऐतिहासिक चित्रपट आहे. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत, मुद्दे वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याव्यतिरिक्त चित्रपटसृष्टी ही एका परिवारासारखी आहे. त्यामुळे या निर्णयाचा दोन्ही चित्रपटांना निश्चितच फायदा होईल.'' अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्याशी छेडछाड केल्याप्रकरणी कलर्स वाहिनीला नोटीस