पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दे धक्का २' येतोय

दे धक्का २

सध्या चित्रपटसृष्टीत रिमेक, सीक्वलचा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड पाहता आता  गाजलेला मराठी चित्रपट 'दे धक्का'चाही सीक्वल येणार आहे.  दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'दे धक्का'च्या सीक्वलची  घोषणा केली आहे.  'दे धक्का २' हा जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. 

मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य यांची  प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. २००८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दे धक्का २ 03 Jan 2020

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

'दे धक्का २' चे चित्रीकरण हे लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट ३ जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा  महेश मांजरेकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे.  महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.