पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लष्करातील शूरवीरांवर मालिका, महेंद्रसिंग धोनी करणार निर्मिती

महिंद्रसिंग धोनी

लष्करातील शूर अधिकाऱ्यांवर टीव्ही मालिका  काढण्याचा निर्णय विचाराधीन असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनी या टीव्ही शोची निर्मिती करणार असल्याचं समजत आहे. स्टु़डिओनेस्ट धोनीसोबत भागीदारी करत मालिकेची निर्मिती करणार असल्याचं समजत आहे. 

WADAची रशियावर कारवाई, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याला ४ वर्षे बंदी

या कार्यक्रमात पद्मवीर चक्र आणि अशोकचक्र पुरस्कारप्राप्त  शूर जवान, अधिकाऱ्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. भारताची सेवा करणाऱ्या या वीरांच्या साहसकथा यात पाहायला मिळणार आहे. सध्या या शोच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे, त्यानंतर लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं समजत आहे. 

हैदराबाद एन्काऊंटर: हुज्जत घालणाऱ्या महिला पत्रकाराला सायनाने सुनावले

तूर्त यावर काही बोलण्यास धोनीनं नकार दिला आहे. मात्र जानेवारी २०२० मध्ये हा टीव्ही शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे.