पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Gandhi Jayanti 2019 : या कलाकारांनी साकारली गांधीजींची भूमिका

गांधी जयंती

महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी यांची आज १५० वी जयंती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी मोलाचं योगदान दिलं. आज गांधीजी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आजही जिवंत आहे. अहिंसेच्या मार्गावर चालवण्याची शिकवण गांधीजींनी दिली. त्यांचे विचार विविध भाषांमधून, माध्यमातून जगभरात पोहोचले. यातलं एक माध्यम म्हणजे चित्रपट होय. गांधीजींच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे अनेक चित्रपट आले यातले काही लोकप्रिय ठरले. यात खर तर गांधीजींची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा मोठा वाटा आहे.
गांधीजींची भूमिका रुपेरी पड्यावर साकारणं हे  खरंच आव्हानात्मक होतं. मात्र या कलाकारांनी हे शिवधनुष्य पेललं आणि आपल्या अभिनयानं ती भूमिका अजरामर केली. हे कलाकार कोणते ते पाहू. 

जगातल्या सुंदर स्त्रीचा मेकअप असा करतात का? फॅशन डिझायनरचा भडका

दिलिप प्रभावळकर 
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आतापर्यंत शेकडो भूमिका केल्या. त्यातल्या  ‘चौकट राजा’ मधला ‘नन्नू’, ‘झपाटलेला’मधला ‘तात्या विंचू’, 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मधले आबा टिपरे,  ‘चिमण' अशा असंख्य भूमिका त्यांनी गाजवल्या. 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात प्रभावळकर यांनी गांधीजींची भूमिका साकारली. हिंसा, अधर्माच्या मार्गावरून चाललेल्या गुंडाला सत्याच्या मार्गावरून चालण्याची शिकवण देणाऱ्या बापूंच्या भूमिकेत प्रभावळकर दिसले. संजय दत्तनं स्थानिक गुंडाची भूमिका साकारली होती. त्याच्या कल्पनाविश्वात बापू  वावरत असतात त्याला सत्याच्या मार्गावरून चालण्याची शिकवण देतात, आजच्या पीढीला उमजेल अशा पद्धतीनं कथानकात अनेक बदल केले होते. २००६ साली आलेला हा चित्रपट तेव्हा लोकप्रिय ठरला होता. 

दिलिप प्रभावळकर

बेन किंग्सले 
१९८२ साली आलेल्या 'गांधी' चित्रपटात बेन किंग्सले यांनी गांधीजींची भूमिका साकारली. बेन किंग्सले यांनी साकारलेली ही भूमिका खऱ्या अर्थानं लोकप्रिय  ठरली होती. इतकी वर्षे उलटल्यानंतर आजही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.  या भूमिकेसाठी बेन यांनी अखंड मेहनत घेतली होती. जगभरात त्यांच्या या भूमिकेचं कौतुक झालं.

बेन किंग्सले

 नसिरुद्दीन शहा
रुपेरी पडदा असो किंवा रंगभूमी नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या अभिनयानं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'हे राम' या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी गांधीजींची भूमिका साकारली आहे. तर कमल हासन यांनी साकेत रामची भूमिका साकारली आहे. गांधीजींचा द्वेष करणाऱ्या साकेत रामचं आयुष्य गांधीजींच्या विचारांनी कसं बदलतं या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. 

 नसिरुद्दीन शहा

'बिग बॉस मराठीमुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलो'

रजित कपूर 
'द मेकिंग ऑफ द महात्मा' या चित्रपटात रजित कपूरनं तरुणपणीच्या गांधीजींची भूमिका साकारली. तरुणपणीच्या जीवनात गांधीजी कसे होते यावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.