पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घर में घुसकर मारेंगे, जावेद अख्तर यांना करणी सेनेची धमकी

जावेद अख्तर

बुरख्याबरोबरच घुंघटवरही  बंदी असायला हवी असं मत मांडणाऱ्या ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना करणी सेनेने धमकी दिली आहे. राजस्थानी घुंघट प्रथेविरोधारात  आवाज उठवणाऱ्या जावेद अख्तर यांनी  माफी  मागावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार व्हावं असा धमकीवजा इशारा महाराष्ट्र करणी सेनेनं दिला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी जावेद अख्तर यांना तीन दिवसांत माफी मागावी नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली आहे.

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे बुरख्यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी भारतातही लागू करावी यावरून  वाद सुरू आहे. या वादात उडी घेत  घुंघटवरही  बंदी आणावी असं मत त्यांनी एका कार्यक्रमात मांडलं होतं.  यावरून महाराष्ट्र करणी सेना आक्रमक झाली आहे. 'जावेद अख्तर यांनी राजस्थानच्या संस्कृतीवर बोट दाखवू नये.  जावेद अख्तर  यांनी  तीन दिवसांत माफी  मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहावे. करणी सेनेला अशा लोकांना कसं उत्तर द्यायचं हे चांगलं ठावूक आहे. वाटल्यास अख्तर यांनी संजय लीला भन्साळी यांना विचारावे. जर कोणी राजस्थानाच्या संस्कृतीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे फोडण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही. जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागितली नाही तर घरात घुसून मारू' असा धमकीवजा इशारा करणी सेनेनं  जावेद अख्तर यांना दिला आहे. 

'महिला सबलीकरण होणं गरजेचं आहे. महिलांचा चेहरा झाकण्याची प्रथा बंद व्हायलाच हवी मग तो बुरखा असो  किंवा   घुंघट' असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांना करणी सेनेच्या रोषाला सामोर जावं लागत आहे.