पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नटसम्राट' श्रीराम लागूंच्या नावाने महाराष्ट्र सरकार देणार पुरस्कार

डॉ. श्रीराम लागू

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या नावाने 'नटसम्राट श्रीराम लागू' पुरस्काराची सुरुवात करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत घोषणा केली आहे. मराठी रंगभूमीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्याला यापुढे 'नाटसम्राट श्रीराम लागू' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

तर मराठी चित्रपट चालणार कसे? मृण्मयीचा प्रश्न

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी एकूण १२ विविध सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना  राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आता यावर्षापासून मराठी नाट्य कला क्षेत्रातील पुरस्कार ‘नटसम्राट श्रीराम लागू’ या नावाने देण्यात येणार आहे. 

VIDEO : सूर्यवंशीचा 'Power-packed' ट्रेलर पाहिलात का ?

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये श्रीराम लागू यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले होते. 'सामना', 'सिंहासन', 'पिंजरा' यासारख्या हे त्यांचे मराठी चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.  'नटसम्राट' या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. अत्यंत अभ्यासू आणि विचारी अभिनेता अशी त्यांची ओळख होती. 

'स्टारकिड्समुळे मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra governments cultural affairs department has announced an award in the name of actor shriram lagoo