पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तान्हाजी करमुक्त, राज्य सरकारचा निर्णय

तान्हाजी द अनसंग वॉरियर

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियन सिनेमा राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. इतर काही राज्यांनी यापूर्वीच तान्हाजी सिनेमा करमुक्त केला आहे. 

'हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम हेच तर काँग्रेस करत आलाय'

तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. १० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर बाराव्या दिवशी तान्हाजीने २०० कोटी रुपये कमाईचा टप्पा ओलांडला आहे. बाराव्या दिवशी या सिनेमाने सात कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, तान्हाजी सिनेमाला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तुलनेत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये या सिनेमाला हवा तेवढा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही.

केंद्राची बाजू ऐकल्याशिवाय CAA ला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

तान्हाजी सिनेमा करमुक्त करावा, यासाठी महाराष्ट्रात सातत्याने मागणी केली जात होती. योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी हा सिनेमा करमुक्त करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.