पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी'मध्ये जन्मस्थळाचा उल्लेख नाही, गावकरी नाराज

तान्हाजी द अनसंग वॉरियर

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या  'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाईही केली आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा गल्ला जमवेल. मात्र या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील गोडोली गावातील लोक नाराज आहेत. गोडोली या गावात तान्हाजी मालुसरेचां जन्म झाला, मात्र चित्रपटात या गावाचा साधा उल्लेखही नाही त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. 

मिस वर्ल्ड मानुषीनं शेअर केली 'पृथ्वीराज' मधली पहिली झलक

सातारा जिल्ह्यातील गोडोली गाव हे मालुसरेंचं जन्मस्थळ आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र चित्रपटात तान्हाजी मालुसरे हे  उमरठ गावचे असल्याचं दाखवण्यात  आलं आहे. यावर गावकऱ्यांचा आक्षेप आहे. म्हणूनच गावकरी निर्माते आणि दिग्दर्शकांचीही भेट घेणार असल्याचं समजत आहे. 

'अण्णा नाईक' करणार सैनिकांना मदत

'तान्हाजी' या चित्रपटात अजय देवगन तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. ओम राऊत यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून १० जानेवारीला हा चित्रपट देशात प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात तो मराठीतही प्रदर्शित करण्यात आला.