पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्चीची टक्केवारी सुधारली पण 'इंग्लिश'चं गणित बिघडलं

रिंकु राजगुरु

महाराष्ट्र राज्याच्या उच्च माध्यमिक परीक्षेत सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने दहावीपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले. मात्र बारावीत तिने दहावीपेक्षा अधिक गुण मिळवले असले तरी इंग्रजी विषयात मात्र तिला दहावीपेक्षाही कमी गुण मिळाले आहेत.  बारावीच्या परीक्षेत आर्चीने तब्बल ८२ टक्के गुण मिळवले आहेत.

८२ % गुण मिळवून अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावी उत्तीर्ण


रिंकु राजगुरु एचएससी गुणपत्रक

'सैराट' चित्रपटात 'इंग्लिशमध्ये सांगू का' हा तिचा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच दहावीनंतर आता बारावीत तिने इंग्रजी विषयात किती गुण मिळवले याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता निश्चितच असेल.  बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिने टक्केवारीत सुधारणा केली असली तरी इंग्रजी विषयात तिला इतर विषयाच्या तुलनेत आणि दहावीच्या तुलनेत कमी गुण मिळाले आहेत.

'मलायकासोबतचं नातं यापुढे लपवायचं नाही'

रिंकुला इंग्रजीमध्ये १०० पैकी  ५४ गुण मिळाले आहेत. तर भुगोल विषयात तिने सर्वाधिक ९८ गुण मिळवले आहेत. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिने हिंदी विषयात सर्वाधिक ८७ गुण मिळवले होते. तर यावेळी इंग्रजी विषयात तिने बारावीपेक्षा अधिक म्हणजे ५९ गुण मिळवले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra board 12th result 2019 marathi actor rinku rajguru 12th result English Subject Marks