दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण आणि महाभारत या दोन मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येत आहे. त्यातल्या 'महाभारत' या गाजलेल्या मालिकेत अभिनेते नितीश भारद्वाज यांनी केलेली श्रीकृष्णाची भूमिका सर्वांनाच ठावूक आहे. या भूमिकेनं त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. मात्र हिच भूमिका करण्यासाठी ते टाळाटाळ करत होते. विशेष म्हणजे यापूर्वी 'महाभारता'त त्यांना श्रीकृष्णाआधी विदूर आणि नकुल- सहदेव या भूमिका देण्यात आल्या होत्या. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका कशी मिळाली याचा एक किस्सा सांगितला आहे. अनेकांना यामागची कहाणी ठावूक नाही.
..म्हणून 'रामायणा'नंतर १४ वर्षांत मनोरंजन विश्वातून लांब राहिले 'राम'
'महाभारत मालिकेला सुरुवात होण्याआधी विदूर या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. मी मेकअपरुमध्ये तयार होऊन बसलो इतक्यात माझ्यासमोर त्याच वेशभूषेत तयार होऊन विरेंद्र राझदान आले. माझ्याजागी त्यांची विदूर या भूमिकेसाठी निवड झाल्याचं त्यांनी मला सांगितलं. अर्थात मी धावत रवी चोप्रा यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. विदूर ही भूमिका ज्येष्ठ व्यक्तीची आहे तर माझे वय केवळ २३- २४ वर्षांचे आहेत, एका तरुण व्यक्तीला ही भूमिका साजेशी दिसणार नाही, असं ते मला म्हणाले त्यामुळे महाभारतातून माझं काम गेलं, असं नितीश यांनी सांगितलं.
त्यानंतर काही दिवसांनी नितीश यांना पुन्हा महाभारतात नवी भूमिका देऊ करण्यात आली. ही भूमिका होती नकुल- सहदेव यांची. मात्र नितीश यांनी ती भूमिका प्रांजळपणे नाकारली. याऐवजी अभिमन्यूची भूमिका मला द्या अशी विनंती त्यांनी केली. मात्र अभिमन्यूची भूमिका करण्याचा योग देखील जुळून आला नाही.
२५ कोटी दान करण्याआधी पत्नी ट्विंकलनं अक्षयला विचारला होता एक प्रश्न
दरम्यानच्या काळात नितीश हे कोल्हापूरमध्ये एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. काही दिवसांनी त्यांना चक्क श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं. मात्र ही भूमिका करण्यासाठी ते टाळाटाळ करत होते. कित्येक दिवस त्यांनी या ऑफरला उत्तरच दिले नव्हते, यामागचं कारण सांगताना ते म्हणाले 'ही खूपच मोठी भूमिका होती, माझ्यासारखा नवखा कलाकार ही महानायकाची भूमिका साकारेल की नाही ही भीती मला सतावत होती. मला आत्मविश्वासच वाटत नव्हता म्हणून कित्येक दिवस या ऑफरला उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत होतो.'
कोल्हापूरवरून परतल्यानंतर नितीश वेगळ्या कामात व्यग्र झाले यावेळी डबिंगच्या दरम्यान त्यांनी बीआर चोप्रा यांच्याशी भेट झाली. 'मी ही भूमिका स्वीकरण्यासाठी का टाळाटाळ करतोय? असं त्यांनी मला खडसावून विचारलं. मी खंर कारण सांगितलं. मात्र एकदा स्क्रीन टेस्ट देण्याची विनंती त्यांनी मला केली. मी मोठा धीर करुन श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट दिली त्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदललं' असा अनुभव त्यांनी सांगितला.
कुणाचं काय तर कुणाचं काय, ऋषी कपूर म्हणतात, मद्य विक्रीला परवानगी द्या