पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुटुंबीयांच्या विरोधामुळे मधुबाला यांचा बायोपिक रखडला, बहिणीची कबुली

मधुबाला यांचा बायोपिक रखडला

आरस्पानी सौंदर्यानं आणि आपल्या हास्यानं घायाळ करणाऱ्या मधुबाला या आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याची घोषणा काही वर्षांपूर्वी झाली होती, मात्र कुटुंबियांच्या विरोधामुळे बायोपिक न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

VIDEO : तांबड्या मातीतला रांगडा गडी 'केसरी'

इम्तियाज अली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते, मात्र मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची  निर्मिती होणार नसल्याचं त्यांच्या बहीण मधुर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी साधलेल्या संवादात म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी बायोपिकची घोषणा करण्यात आली होती. मात्र दोन वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही चित्रपटाबद्दल कोणतीही हालचाल दिसली नाही. यामागचं कारण मधुर यांनी सांगितलं आहे.  कुटुंबीयांनी तूर्त चित्रपटाच्या निर्मितीसाठी नकार दिला आहे त्यामुळे बायोपिक रखडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, मात्र कुटुंबीयांचं मन वळवण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ असा विश्वास मधुर यांनी व्यक्त केला.

सलमानला भेटण्यासाठी तो ६०० किलोमीटर सायकल चालवत आला

पण इम्तियाज अली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार की नाही यावर मधुर यांनी शंका उपस्थित केली आहे. कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर इम्तियाज यांनी या प्रोजक्टपासून स्वत: लांब राहणं पसंत केलं. तो एक सज्जन दिग्दर्शक आहे. कदाचित पुन्हा हा चित्रपट करण्याविषयी त्यांचं मत बदलेल अशी आशा मधुर यांनी व्यक्त केली आहे.  एप्रिल- मेपर्यंत कुटुंबीयांचे  मन  वळवण्यात मी यशस्वी होईल  त्यानंतरच चित्रपटाविषयी सांगितलं जाईल असंही त्या म्हणाल्या.