पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉसच्या घरात किशोरीताईंवर खूप इमोशनल अत्याचार झाले'

किशोरी शहाणे

बिग बॉस मराठीच्या घरातून माधव देवचके बाहेर पडला. बिग बॉसच्या घरातील हा सर्वात चांगला स्पर्धक राहिला आहे. घरातील सर्वांसोबत तो चांगला रहायचा आणि वागायचा सुध्दा. नेहा, शिवानी आणि हीना या तिघी जरी त्यांच्या चांगल्या मैत्रिणी राहिल्या असल्या तरी माधवला किशोरीताई देखील तितक्याच आवडायच्या. किशोरीताईंसोबत त्याचे कधीच भांडण झाले नाही. मात्र घरातील इतर स्पर्धक किशोरीताईंना टार्गेट करायचे. दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये किशोरीताईंवर इमोशनल अत्याचार झाले असल्याचे मत माधवने घराबाहेर पडल्यानंतर व्यक्त केले आहे. 

बाळाच्या नावासह अर्जुन रामपालने इन्स्टावर गोंडस फोटो केला शेअर

माधवने असे सांगितले की, किशोरीताई या बिगबॉसच्या घरातील खूप चांगल्या स्पर्धक आहेत. मी त्यांना सलाम करतो. त्या घरामध्ये खूप चांगल्या खेळतात. किशोरीताईंच्या बाबतीत बिग बॉसच्या घरामध्ये खूप काही गोष्टी घडल्या. मात्र त्या दाखवल्या गेल्या नाहीत. कदाचित त्या दाखवल्या जाणे बिग बॉसला गरजेचे वाटले नसेल. मात्र किशोरीताईंवर घरामध्ये खूप इमोशनल अत्याचार झाले, असल्याचे मत माधवने व्यक्त केले आहे. 

बिग बॉस मराठी सिझन २ - माधव देवचके घराबाहेर

पुढे तो असं म्हणाला की,  'किशोरीताई आता टास्क खूप चांगल्या खेळायला लागल्या आहेत. स्वत:ला सुधरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या बिग बॉसच्या घरातील खडतर प्रवासात स्वत:ला नेहमी सिध्द करत आल्या आहेत. त्यांचे वय लक्षात घेता त्या अप्रतिम खेळत आहेत. त्यांच्यावर घरामध्ये ऐवढे इमोशनल अत्याचार झाले तरी देखील त्यांनी खूप चांगल्या पध्दतीने कमबॅक केले.'

ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये, ट्विटरवर मीम्सचा पूर!

दरम्यान, माझे वय तेवढा त्यांचा कामाचा अनुभव आहे. त्यांचे चित्रपट पाहत मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी ऐवढेच मला वाटत असल्याचे माधवने सांगितले. तसंच बिग बॉसच्या घरामध्ये आम्ही खूप गप्पा मारायचो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले असून नेहमी मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटत राहिल, असे देखील माधवने सांगितले. 

थिएटरमध्ये मोबाईल ड्रामा! 'आणि.. सुबोध भावे संतापला..'