पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मा आनंद शीलानं बायोपिकसाठी प्रियांकाला नाकारले, मात्र आलियाला दिली परवानगी

मा आनंद शीलानं बायोपिकसाठी प्रियांकाला नाकारले

शीला बिएर्निस्टिल ज्या मा आनंद शीला या नावानंही ओळखल्या जातात, एकेकाळी अनेक वाद विवादांच्या केंद्रस्थानी होत्या. ७० वर्षीय मा आनंद शीला यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. मात्र मा आनंद शीला  यांनी प्रियांकाला बायोपिकमध्ये  काम करण्याची परवानगी नाकारली आहे. 

सिनेमात 'नो किसिंग सीन'साठी तमन्ना भाटियाने तयार केला हा नियम

'मी तूझी निवड केलेली नाही, त्यामुळे  बायोपिकमध्ये माझी भूमिका साकरण्याची परवानगी मी तूला देत नाही', असं म्हणत मा आनंद शीलानं प्रियांकाला कायदेशीर नोटीस पाठवली. वास्तवात मी स्विर्त्झलँडमध्ये तिला एक मेल लिहिली होती, तिथे तो मेल कायदेशीर नोटीस म्हणून ग्राह्य धरला गेला असंही शीला यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं. 

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावरील बायोपिकमध्ये आलिया?

प्रियांकासारख्या ग्लोबल स्टारला मा आनंद शीलानं परवानगी नाकारली मात्र याचवेळी त्यांनी आलिया भट्टनं भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली. माझी बहिण आलियाचे चित्रपट पाहायची, तेव्हा मी आलियाचं काम पाहिलं आहे. मी तरुणपणी अगदी आलियासारखी दिसायची, माझी बहिणही या मताशी सहमत आहे, आलियाचं ती भूमिका साकारू शकते, ती अधिक खरी वाटेल असं मत मा आनंद शीलानं व्यक्त केलं आहे.