पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका- रणबीरची जोडी पुन्हा दिसणार एकत्र ?

दीपिका- रणबीर

अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूरची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. 'बचना ए हसिनो', 'ये जवानी है दिवानी', 'तमाशा' सारख्या चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केलं आहे. या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. दिग्दर्शक लव राजन दीपिका आणि रणबीरसोबत एक नवा चित्रपट घेऊन येणार अशी चर्चा आहे. २०१८ मध्ये लव राजननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये  रणबीर आणि अजय देवगनसोबत एक पोस्ट शेअर केली होती. मात्र अजयनं या चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर आता दीपिका- रणबीरला एकत्र  घेऊन चित्रपट काढण्याचा लव राजनचा मानस असल्याचं वृत्त पिंक व्हिलानं दिलं आहे. 

भारत गणेशपुरे म्हणतात, प्रत्येकाने स्वत:साठी मतदान करायला हवे

दीपिका आणि रणबीर या दोघांनीही चित्रीकरणाच्या तारखा उपलब्ध करून दिल्या असल्याचंही समजत आहे. मात्र दीपिकानं याची अधिकृत घोषणा अद्यापही केलेली नाही. काही दिवसांपूर्वीच दीपिकानं लव राजनची भेट घेतली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्याविरोधात वारे वाहू लागले होते. #NotMyDeepika हा हॅशटॅग वापरून चाहत्यांनी दीपिकाला लव राजन यांच्यासोबत काम न नकरण्याची विनंती केली होती. 
तिनं लव राजन यांच्यासोबत काम करू नये असं अनेक चाहत्यांना वाटत होतं.  गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या मी टु वादळात दिग्दर्शक लव राजन यांचंही नाव समोर आलं होतं.२०१८ साली मिड डेला दिलेल्या  मुलाखतीत एका अभिनेत्रीनं लव राजन यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. २०१० साली एका चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान लव राजन यांनी लैंगिक गैरवर्तणुक केली असं ती या मुलाखतीत म्हणाली होती. मी टु मोहिमेत नाव आल्यानंतर लव राजननं माफी देखील मागितली होती. 

पुष्कर- अमृताची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर

आता दीपिका खरंच रणबीरसोबत लव राजनच्या चित्रपटात काम  करणार का हे पाहण्यासारखं ठरेन.