पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला कार्तिकसोबत वेळ घालवायला आवडतं, अनन्याची कबुली

कार्तिक अनन्या

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिनं  'स्टुडंट ऑफ द इअर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनन्याचं नाव अभिनेता कार्तिक आर्यनशीही जोडलं गेलं. ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा  काहीमहिन्यांपूर्वी  होत्या. या चर्चांवर मौन बाळगणं दोघांनी पसंत केलं. आता ही जोडी 'पती पत्नी और वो' चित्रपटात झळकणार  आहे. कार्तिकविषयी फारसं न बोलणाऱ्या अनन्यानं हिंदूस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मात्र कार्तिकचं भरभरून कौतुक केलं आहे. 

'मला कार्तिकसोबत वेळ व्यतित करायला आवडतो',  असं ती म्हणाली. 'कार्तिक आणि मी चांगले  मित्र आहोत.  आम्ही एकाच चित्रपटात काम करत आहोत.  मला त्याच्यासोबत काम करायला,  वेळ व्यतीत करायला खूप आवडतं',  असंही  अनन्या म्हणाली. 'कार्तिक हा निस्वार्थी व्यक्ती आहे. तो नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असतो. चित्रपटातील दृश्य  खूप सुंदर होण्यासाठी  जे जे प्रयत्न करावे लागतील ते  प्रयत्न आणि तितकी मेहनत करण्याची त्याची तयारी असते. इतकंच नाही तर अनेकदा तो मला देखील काही गोष्टी सुचवतो. मी या क्षेत्रात नवीन आहे तर तो अनुभवी आहे. त्याचं मार्गदर्शन मला नेहमीच कामी येते',  असं कौतुक अनन्यानं  केलं.

कार्तिक , अनन्या आणि भूमि पेडणेकर 'पती पत्नी और वो' च्या रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र  काम करत आहेत.