पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॅलेंटाइन डेमुळे 'लव्ह आज कल'ची तुफान कमाई, मात्र पुढचं काय?

लव्ह आज कल

समीक्षकांना प्रभावित करण्यास अपयशी ठरलेल्या सारा अली खान - कार्तिक आर्यनच्या 'लव्ह आज कल'नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी मात्र तुफान कामाई केली आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२.४० कोटींचा गल्ला जमवला आहे.  १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दिवशी व्हॅलेंटाइन डे असल्यानं चित्रपटाला याचा चांगला फायदा झाला पण पुढचे दिवस हा चित्रपट चांगली कमाई करणार का? यावर शंका उपस्थित केली जात आहे. 

कुटुंबीयांच्या विरोधामुळे मधुबाला यांचा बायोपिक रखडला, बहिणीची कबुली

इम्तिआज अलीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मात्र इम्तिआज अलीच्या 'जब हॅरी मिट सेजल'पेक्षाही या चित्रपटाची कथा वाईट असल्याचं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची खिल्ली उडवली  जात आहे. त्यामुळे शनिवार , रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी  घट होईल अशी भीती चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता  विकेंडला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतो का हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

पुण्यातील 'सविता भाभी'च्या पोस्टरमागे, अश्लील उद्योग मित्रमंडळ?

हा चित्रपट दीपिका पादुकोन आणि सैफ अली खानच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा दुसरा भाग आहे. दीपिका- सैफच्या 'लव्ह आज कल' ला प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही चांगला  प्रतिसाद मिळाला होता मात्र सारा- आर्यनच्या चित्रपटानं अपेक्षाभंग केल्याचं म्हटलं जात आहे.