पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नैराश्येतून खळखळून हसविण्याकडे, लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकाराचा नवा प्रयोग

विजय पटवर्धन

सतत वाढत जाणारा कोरोना विषाणू  बाधितांचा आकडा, धडकी भरवणारी मृतांची संख्या, चिंतेत टाकणारी बाहेरची परिस्थिती या सगळ्यानं मन खिन्न झालं आहे, यातून मन दुसरीकडे वळवण्यासाठी लोक पर्याय शोधत आहेत. थोडावेळ का होईना यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी अभिनेते विजय पटवर्धन यांनी लॉकडाऊनच्या काळात नवा प्रयोग केला आहे. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

कोरोनाशी लढण्याकरता आमिर खान करणार अशी मदत

विजय पटवर्धन आणि त्यांच्या पत्नीनं काही छोटे विनोदी व्हिडिओ तयार केले आहेत. घराबाहेर न पडता आणि घरातील सदस्यांच्या मदतीनं विजय पटवर्धन यांनी तयार केलेले विनोदी व्हिडिओ हे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. 'सतत बातम्या बघून कंटाळा, नैराश्य येण्यापेक्षा लोकांनाही थोडं हसू दे असं म्हणत आम्ही नेहमीचेच विनोद वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर आणले. काही विनोद नाटकातले होते, तर काही लोकांनींही सुचवले आणि असं करता करता  हा प्रयोग यशस्वी झाला' असं विजय पटवर्धन म्हणाले. 

भारतीय वंशाची सौंदर्यवती कोरोनाशी लढण्याकरता डॉक्टर म्हणून रुजू

यात विजय यांच्या पत्नीसोबत त्यांची लहान मुलगी, मेहुणा आणि या क्षेत्रातल्या मित्रपरिवारानंही  साथ दिली. त्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नानं काहीवेळात हे व्हिडिओ तयार होतात. 'सध्याच्या टेंन्शनच्या परिस्थितीत, सर्वांचं दोन मिनिटांत मनोरंजन व्हावं, त्यांच्या चेहऱ्यावर छोटीशी तरी स्मितरेषा उमटावी याकरता हे छोटे छोटे विनोद सादर करत आहोत. विचार करुन चिंतेत राहण्यापेक्षा दोन मिनिटं हे बघा, हसा आणि दोन मिनिटं तरी टेंन्शन मुक्त व्हा.' असा संदेश त्यांनी प्रेक्षकांना दिला आहे. 

'सततच्या बातम्या बघून नकारात्मकता येत असेल तर काही तरी वाचा, घरी रहा, सुरक्षित राहा आपल्यामुळे कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही आणि कोणामुळे आपल्याला कोरोना होणार नाही याची काळजी घ्या', अशी विनंतीही त्यांनी केली.