पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधात लढा : लतादीदींकडून राज्यासाठी २५ लाखांची मदत

लतादीदी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील कोरोनाविरोधात लढाईसाठी आपला खारीचा वाटा उचलला आहे. लतादीदींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांची मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी लतादीदींचे आभार मानले आहेत.

धन्य निर्णय! कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना दिले रेनकोट, सनग्लासेस

'नमस्कार. आपण आपल्या सरकारला या कठीण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.' असं आवाहन लतादीदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे.

काहीदिवसांपूर्वी लता मंगशेकर यांनी ट्विट करत देशवासीयांना सरकारच्या सूचना   पाळण्याचं आवाहन केलं होतं. लोकांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरीच बसण्याचं आवाहन केलं होतं मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्री वारंवार सांगूनही काही लोक का ऐकत नाही? असा चिडून सवाल लतादीदींनी विचारला होता. 

गायिका कनिकाची प्रकृती स्थिर, पाचव्यांदा देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्हच

लतादीदींबरोबरच आज रोहित शर्मा, खेळाडू राहुल आवारे, अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री आलिया भट्ट यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत जाहीर केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Legendary singer Lata Mangeshkar donates Rs 25 Lakh to Chief Ministers Relief Fund Maharashtra for the fight against COVID19