पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२८ दिवसांनंतर लतादीदींना डिस्चार्ज, त्यांनीच दिली घरी आल्याची माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर

भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून घरी परतल्याची माहिती खुद्द लता दीदींनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह आपल्या चाहत्यांचे खास आभार मानले आहेत.  

...म्हणून सोनिया गांधी वाढदिवस साजरा करणार नाहीत

लता दीदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, "नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर मी आज घरी आले. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आचा ठीक आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहेत. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत.. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावे"

दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू

११ नोव्हेंबरपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मध्यरात्री २ वाजता त्यांना श्वसनाचा त्रास उद्धभवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. लता दीदींनी केलेल्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.