पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफवांवर विश्वास ठेवू नका; लता मंगेशकरांच्या कुटुंबियांचे आवाहन

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या ५ दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आणि पूर्वीपेक्षा चांगली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. तरी सुध्दा सोशल मीडियावर वारंवार त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवली जात आहे. दरम्यान, 'लतादीदींच्या आरोग्याबाबत अफवा पसरत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवण्यापेक्षा त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा', असे आवाहन मंगेशकर कुटुंबियांनी केले आहे.

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार: फडणवीस

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने सोमवारी पहाटे २.३० च्या सुमारास त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकर त्यांना घरी पाठवण्यात येईल. आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. मात्र लतादीदींबाबत पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करणारे ट्विट त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. 

एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा तयार, पक्षश्रेष्ठी घेणार अंतिम निर्णय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:latadidi is stable and getting better please do not heed to needless rumours appeal by lata mangeshkar family