पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अंधाधून'मध्ये छान काम केलंस, आयुष्मानच्या पाठीवर लतादीदींच्या कौतुकाची थाप

आयुष्मानच्या पाठीवर लतादीदींच्या कौतुकाची थाप

गानसम्राज्ञी लतादीदींनी अभिनेता आयुष्मानचं 'अंधाधून'मध्ये केलेल्या सर्वोत्तम अभिनयासाठी कौतुक केलं आहे. आयुष्यमानचा २०१८ साली प्रदर्शित झालेला 'अंधाधून' चित्रपट खूपच गाजला होता. या  चित्रपटातील अभिनयासाठी आयुष्मानला सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला. 

४ वर्षानंतर मराठी चित्रपटात झळकणार अजिंक्य देव

 खुद्द लतादीदींनी आयुष्मानच्या कामाचं कौतुक करत त्याला जणू कामाची पोचपावतीच दिली आहे. लतादीदींनी नुकताच 'अंधाधून' पाहिला आणि चित्रपट पाहून झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत आयुष्मानच्या कामाचं कौतुकही केलं.  'मी  तुझा चित्रपट आज पाहिला, तू खुप छान काम केलंस यात तू जी गाणी गायली तीदेखील माझ्या पसंतीस उतरली आहेत. तुला  भविष्यात असंच यश प्राप्त होवो यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असा संदेश लतादीदींनी आयुष्मानसाठी लिहिला आहे. 

लतादीदींच्या या अनपेक्षित कौतुकांनं आयुष्मानही भारावून गेला आहे. आशीर्वाद दिल्याबद्दल आभार, तुमच्या तोंडून कौतुक ऐकण्यासाठीच कदाचित मी अधिक मेहनत घेतली असेल' असं म्हणत आयुष्माननंही लतादीदींचे आभार मानले आहेत. 

तापसीच्या 'थप्पड'ची बॉक्स ऑफिसवर संथ कमाई

यापूर्वीही लतादीदींनी आयुष्मानचं कौतुक केलं होतं. 'तो एक चांगला अभिनेता आणि गायक  आहे. त्याला संगीताची समज आहे, अभिनयात जितकं  स्वत:ला झोकून देतो तितकी मेहनत त्यानं  संगीतावरही घ्यावी. त्यानं संगीताची आराधना करावी. तो नक्की यात प्रगती करेल' अशा विश्वास काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत लतादीदींनी व्यक्त केला होता. 

अभिनेत्यानं नाकारली सलमानची ऑफर