पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रानू मंडलचं गाणं ऐकून लता मंगेशकर म्हणतात....

लता मंगेशकर- रानू मंडल

सोशल मीडियामुळे रातोरात सुपरस्टार झालेल्या रानू मंडल यांची सर्वत्र चर्चा आहे. रानघाट स्टेशनवर गाणी गाऊन रानू आपलं पोट भरायच्या. त्यांच्या सुरेल आवाजातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा है' गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. रानू यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीवर लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

रानू मंडलच्या प्रसिद्धी आणि पैशांचा मॅनेजर गैरवापर करतात, मुलीचा आरोप

'माझ्यामुळे आणि माझ्या कामामुळे कोणाचं चांगलं होत असेन तर मी स्वत:ला सुदैवी समजते, पण तात्पुरता यश हे दीर्घकाळ टिकत नाही, माझं, मोहोम्मद रफी, किशोर दा किंवा आशा यांची गाणी गाऊन काही काळापुरता तुम्हाला प्रसिद्धी मिळेन मात्र ती अल्पावधीत नष्ट होईन, असं लता दीदी म्हणाल्या. 

रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट दिल्याच्या निव्वळ अफवा

त्याचप्रमाणे म्युझिक रिअॅलिटी शोचं वाढत चाललेल्या महत्त्वाबद्दलही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेक लहान लहान मुलं माझी गाणी खूप सुंदर प्रकारे गातात. पण त्यातली किती लहान मुलं प्रेक्षकांच्या लक्षात आहेत? सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल सोडलं तर मला कोणीही आठवत नाही. दुसऱ्यांची गाणी गाण्यापेक्षा नवीन गाण्यांचा नव्या, संधीचा शोध घ्या, असाही सल्ला त्यांनी नवोदितांना दिला आहे.