पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गानसम्राज्ञी लता मंगेशकर इन्स्टाग्रामवर

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच आपला ९० वा वाढदिवस साजरा केला. ट्विटर सारख्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या लतादीदी आता इन्स्टाग्राम या फोटो  शेअरिंग अ‍ॅपच्या मार्फत जगभरातील आपल्या चाहत्यांशी जोडल्या जाणार आहेत.

देवीची रुपं साकारण्यासाठी तेजस्विनीनं घेतली कित्येक दिवसांची मेहनत

लतादीदी या इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टीव्ह नव्हत्या. सोमवारी त्यांनी ट्विटरवर आता तुमच्याशी इन्स्टाग्रामद्वारे जोडले जाणार असल्याची माहिती तमाम चाहत्यांना दिली.  आपल्या सुरेल आवाजानं जगभरातल्या चाहत्यांच्या हृदयात घर करणाऱ्या लतादीदींनी इन्स्टाग्रामवर आपली पहिली पोस्ट लिहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Namaskar. Aaj pehli baar aap sabse Instagram pe jud rahi hun.

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar) on

'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक

लतादीदींच्या दुर्मिळ आठवणींचा संग्रह असलेल्या आणि त्यांची लहान बहीण मीनाताई खाडीकर यांनी लिहिलेल्या 'दीदी और मै' या हिंदी पुस्तकाचं अनावरण रविवारी करण्यात आलं. या पुस्तकाची पहिली प्रत मीनाताईंनी तलादीदींना भेट दिली.  अमुल्य आठवणींचा संग्रह असलेल्या या मौल्यवान भेटीचा फोटो लतादीदींनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.