पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लता मंगेशकर यांची प्रकृती ठिक, भाची रचना शहा यांची माहिती

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत आता ठिक आहे, अशी माहिती  त्यांची भाची रचना शहा यांनी गुरूवारी दिली. मात्र लतादीदी यांच्या तब्येतीबद्दल अधिक माहिती सांगायला त्यांनी नकार दिला. लतादीदी या ९० वर्षांच्या असून ११ नोव्हेंबरला पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे'मधून कृति खरबंदा बाहेर

'लताजी या पूर्वीपेक्षा  ठिक आहेत. यापलीकडे आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नाही.' असं रचना पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. 'लतादीदी अजूनही अतिदक्षता विभागात आहेत.  त्यांची  प्रकृती  स्थिर आहे.' अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
पंकज उधास पहिल्यांदाच मराठीत गाणार भावगीत

बॉलिवूडचे दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनीही लतादीदींची भेट घेतली.  त्यांची प्रकृती स्थिर असून त्या  उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती  मधूर भंडारकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली होती.