पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आठवड्याभरानंतर लता मंगेशकर यांची प्रकृती पूर्वीपेक्षा ठिक

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्यानं लतादीदींना ११ नोव्हेंबरच्या पहाटे  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदींची प्रकृती सुधारावी यासाठी देशभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते प्रार्थना करत आहेत. 

गांधी कुटुंबियांची SPG सुरक्षा काढण्यावरून काँग्रेस आक्रमक

आठवड्याभरानंतर लतादीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा ठिक असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी  बोलताना दिली. लतादीदी या ९० वर्षांच्या आहेत. लतादीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी आहे, यापलीकडे आम्ही काहीही सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी दिली असल्याचं  वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

लतादीदींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन त्या घरी परताव्या अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील लतादीदींची रुग्णालयात जाऊन भेटी घेतली होती.