पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लतादीदींचा आयुष्मान खुरानाला गुरूमंत्र

लतादीदींकडून आयुष्मानचं कौतुक

आयुष्मान खुराना आताच्या घडीचा लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. २०१८- २०१९ या वर्षांत आयुष्माननं 'अंधाधून', 'बधाई हो', 'आर्टिकल १५' आणि 'ड्रिम गर्ल' असे चार सलग सुपरहिट चित्रपट दिलेत. उत्तम अभिनेता, निवेदक,  कवी आणि गायक अशा विविध ठिकाणी आयुष्माननं आपला ठसा उमटवला आहे. 

अशा या आयुष्मानचं कौतुक खुद्द गानसम्राज्ञी लतादीदींनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुरानानं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं की  'सावन के झुले पडे' हे लतादीदींनी गायलेल्या आणि त्याला आवडलेल्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे. 

१९७९ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'जुर्माना' चित्रपटालं हे एक गाणं आहे. आयुष्माननं या गाण्यावर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल लतादीदींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ' या गाण्याबद्दल आता मला फारसं आठवत नाही. मला माहिती आहे तो एक चांगला अभिनेता आणि गायक  आहे. त्याला संगीताची समज आहे म्हणूनच संगीत जाणून त्यानं कौतुक केलं आहे.' असं लतादीदी म्हणाल्या.

त्याचप्रमाणे  सध्या लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याला लतादीदींनी गुरुमंत्रही दिला आहे.  'आयुष्मान अभिनयात जितकं  स्वत:ला झोकून देतो तितकी मेहनत त्यानं  संगीतावरही घ्यावी. त्यानं संगीताची आराधना करावी. तो नक्की यात प्रगती करेल' असा विश्वास लतादीदींनी व्यक्त केला आहे. 

लतादीदींकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर आयुष्मानचा आनंदही  गगनात मावेनासा झाला आहे.