पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रार्थनांना यश लतादीदींची तब्येत सुधारतेय, कुटुंबीयांची माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लतादीदी गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणावरून रुग्णालयात दाखल आहेत. मात्र त्यांची प्रकृती आता सुधारत असून, चाहत्यांच्या प्रार्थनांना यश आलं आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं लतादीदींना सोमवारी पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. 

अक्षयच्या 'पृथ्वीराज'मधून मिस वर्ल्ड मानुषी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

'कळविण्यास आनंद  होत आहे की तुमच्या प्रार्थनांना  आणि सदिच्छांना यश आलं आहे, लतादीदींच्या प्रकृतीत आता चांगल्या सुधारणा होत आहेत' अशी माहिती त्यांच्या कुटुंबींयांनी दिली आहे. 

तसेच लतादीदींच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लतादीदींची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे. 

'पोंनियिन सेलवन' या ऐतिहासिक पटाचं सर्वाधिक चित्रीकरण थाडलंडमध्ये