पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिद्धार्थ जाधवचा धमाल विनोदी चित्रपट 'लग्नकल्लोळ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लग्न कल्लोळ

लग्न हे एक सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपे असले तरी जितके सोडवू तितके कमी असते. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे  नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या  चित्रीकरणाला लवकरच सुरूवात  होणार आहे. 'या सिनेमात कसलेल्या कलाकारांची फौज असल्याने हा नक्कीच धमाकेदार चित्रपट असेन. हा चित्रपट सर्व रसिकांना हसवण्यात नक्कीच यशस्वी होईल. मराठी सिनेमांमध्ये होणारे नवनवीन प्रयोग नक्कीच उल्लेखनीय आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, यात शंका नाही.' असं म्हणतं  हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अब्बास - मस्तान यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. 

'लग्नकल्लोळ' हा चित्रपट लग्न या विषयावर आधारित असेन हे नक्की. या सिनेमातून लग्न हा विषय एका आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. मयूर तिरमखे फिल्म्स या चित्रपटाची  निर्मिती करणार आहेत तर मोहम्मद बर्मावाला 'लग्नकल्लोळ' च्या दिग्दर्शनाची धुरा  सांभाळणार आहेत हा चित्रपट येत्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.