पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'IFFI'त नेत्रहीनांसाठी 'लगे रहो मुन्ना भाई'चे खास शो

लगे रहो मुन्ना भाई

गोव्यामध्ये सुरु असलेल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया'मध्ये राजकुमार हिरानी यांचा 'लगे रहो मुन्ना भाई'हा सुपरहिट चित्रपट नेत्रहीनांसाठी ऑडियो विवरणाद्वारे दाखवण्यात येणार आहे.  

लता मंगेशकर यांची प्रकृती ठिक, भाची रचना शहा यांची माहिती

प्रत्येक चित्रपटात संवाद,  गाणी ही असतातच. मात्र चित्रपटात काही  दृश्य अशीही असतात जिथे संवाद नसतात. केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून काही दृश्य अधिक प्रभावीपणे मांडली जातात. अशा दृश्याचं वर्णन हे  ऑडियो विवरणमध्ये केलं जातं. सक्षम ट्रस्टच्या पुढाकारामुळे हे साध्य झालं आहे. 

पंकज उधास पहिल्यांदाच मराठीत गाणार भावगीत

२३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान हा चित्रपट ऑडियो विवरणाद्वारे मुलांना दाखवण्यात येणार आहे. याआधी राजकुमार हिरानी यांचा पिके आणि संजू हेच तंत्र वापरून  प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटातून महात्मा गांधीजींचे विचार अधिक प्रभावीपणे पोहोचवले आहे. एका स्थानिक गुंडाचं बापूंच्या विचारांनी आयुष्य पूर्णपणे बदलतं याची कथा या चित्रपटात आहे. संजय दत्त, विद्या बालन, अरशद वारसी, दीलिप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे.