पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता

लेडी गागा

पॉप गायिका आणि हॉलिवू़ड अभिनेत्री लेडी गागा रविवारी आपल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने ट्विटरवर एक संस्कृत श्लोकाची पोस्ट केली आहे. लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु। याचा अर्थ जगातील सर्व ठिकाणचे सर्व लोक सुखी राहावेत असा आहे.

लेडी गागाने हे टि्वट करताच ते लगेच व्हायरल झाले. लेडी गागाच्या या टि्वटमुळे भारतीय युजर्स खूश झाले तर उर्वरित जग आश्चर्यचकित झाल्याचे दिसले. लोक या श्लोकाचा अर्थ आणि याच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत ७३ हजारांहून अधिक जणांनी हे टि्वट लाईक केले आहे तर २० हजाराहून अधिक जणांनी ते रिट्विट केले आहे. भारतीय युजर्सनी या टि्वट्चे स्वागत केले आहे. लेडी गागा जगभरातील युवकांमध्ये प्रसिद्ध आहे.

विराट या रुपात छोट्या पडद्यावर उतरण्यास सज्ज

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lady Gaga tweeted a Sanskrit sloka lokah samastah sukhino bhavantu people explain and search meaning of it