पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुशल बेजबाबदार वडील होता, आत्महत्येनंतर पत्नीचा आरोप

कुशल पंजाबीचे कुटुंब

अभिनेता कुशल पंजाबीनं काही दिवसांपूर्वीच गळफास लावून वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. कुशलच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्व हादरलं. कुशल आपल्या पत्नीपासून विभक्त राहत होता. कुशलच्या आत्महत्येसाठी त्याची पत्नी आँड्रे डोलहेन जबाबदार असल्याचेही आरोप झाले, मात्र आँड्रेनं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संसारात कुशल अपयशी  झाला तो अत्यंत बेजबाबदार वडील होता असे आरोप तिनं केले आहेत.

CAA : मुंबईत भाजपच्या कार्यक्रमाला मोजक्याच सेलिब्रिटींची उपस्थिती

कुशलनं २०१५ मध्ये आँड्रेसोबत विवाह केला, मात्र काही काळापासून ते दोघंही विभक्त राहत होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगादेखील आहे. "आमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या जरूर होत्या मात्र ते अपयशी नक्कीच झालं नव्हतं. मी कधीही आमचा मुलगा किआनला कुशलशी बोलण्यावाचून रोखलं नाही.  कुशलला आपल्या कुटुंबाविषयी कधीच गांभीर्य नव्हतं. त्यानं शंघायमध्ये राहावं असा प्रस्ताव मी त्याच्यासमोर ठेवला होता, मात्र त्याला यात रस नव्हता. इतकंच नाही तर कुशलच्या इतर खर्चाची जबाबदारीही मीच घेत होते. कुशलच्या बेजबाबदार वागण्यामुळे किआनलाच वडिलांमध्ये रस उरला नव्हता. मी कुशलसोबतचं नातं वाचवण्यासाठी  खूप प्रयत्न केले'', असं आँड्रे पिपिंग मून या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. कुशलची पत्नी एका चिनी  कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. ''कुशलच्या मृत्यूसाठी लोक मला का जबाबदार ठरवत आहेत हेच मला कळत नाही, या नात्यात जर कोणी अपयशी ठरलं होतं तर तो कुशल होता''  असंही ती म्हणाली. 

मराठमोळ्या कलाकारांच्या उपस्थितीत नेहा-शार्दुलचं शुभमंगल!

''मी कंपनीसोबत करारबद्ध होते, कुशलला  ही गोष्ट समजत नव्हती. मी त्याच्यासोबत लंडनला स्थायिक व्हावं अशी त्याची इच्छा होती. माझ्यासाठी नोकरी सोडणं शक्य नव्हतं. कुशल निष्काळजी होता. त्याला मुलाच्या भविष्याची कोणतीही चिंता नव्हती'', असं म्हणत तिनं आपली बाजू मांडली आहे. तर दुसरीकडे कुशलच्या आई- वडिलांनी मात्र आँड्रेवर गंभीर आरोप केले आहेत. आँड्रेनं कुशलला मर्यादेपलीकडे मानसिक त्रास दिला. ती घटस्फोटासाठी कुशलकडे खूप पैसे मागत होती, तसेच तिनं कियानला कुशलपासून दूर केले. यामुळे कुशल पूर्णपणे धक्क्यात होता या घटनेनंच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं कुशलचे आई वडील म्हणाले होते.