पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

द कपिल शर्मा शो : गोविंदाच्या पत्नीला नको होती 'सपना', कृष्णाला एपिसोडमधून केलं बाजूला

कृष्णा- गोविंदा

गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता गोविंदाचं कुटुंब 'द कपिल शर्मा शो'मध्ये आलं होतं. मात्र गोविंदाच्या येण्यानंतर कॉमेडियन कृष्णा अभिषेकला सेटपासून दूर राहण्यास निर्मात्यांकडून सांगण्यात आलं. गोविंदा- कृष्णा या मामा भाच्यांमध्ये काही कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे गोविंदाची पत्नी सुनिता यांच्या सुचनेनुसार कृष्णाला एका भागामधून हटवण्यात आलं. 

गर्ल्स टीझर : 'बॉईज'नं करून दिली बोल्ड 'गर्ल्स'ची ओळख

'मी त्या दिवसापूरता शोमध्ये सहभागी होऊ नये अशी सुनिता मामीची इच्छा होती, असं मला द कपिल शर्मा शोच्या टीमकडून कळलं. त्यामुळे ते शोमध्ये येण्यापूर्वीच्या स्किटमध्ये मी सहभागी होतो त्यानंतर मी निघून गेलो. मी साकारत असलेली सपना ही या शोमधली महत्त्वाची भूमिका आहे. मला प्रचंड धक्का बसला आणि वाईटही वाटलं', असं कृष्णा बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

अक्षयसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये होणार हा सर्वात मोठा बदल

मला याविषयावर कोणताही वाद घालायचा नव्हता. कारण नर्मदासाठी (गोविंदाची मुलगी) हा महत्त्वाचा  दिवस होता. ती तिच्या अल्बमच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आली होती. नर्मदा माझी लहान बहीण आहे आणि मोठा भाऊ या नात्यानं तिच्यासाठी  मी यातून लांब राहण्याचं ठरवलं असं कृष्णानं सांगितलं. 

कपिल प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, उदित नारायण यांची पोलखोल