पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे'मधून कृति खरबंदा बाहेर

कृति खरबंदा

अमिताभ बच्चन यांच्या आगामी  'चेहरे' चित्रपटात कृति खरबंदा ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. मात्र आता ती चित्रपटातून बाहेर पडली आहे. कृति आणि निर्मात्यामधील वादामुळे तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अशा चर्चा होत्या मात्र यावर निर्माती कंपनी आनंद पंडित मोशन पिक्चर्सनं स्पष्टीकरण दिलं आहे. 

पंकज उधास पहिल्यांदाच मराठीत गाणार भावगीत

'कृति बद्दल अनेक चर्चा होत आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की कृति आणि कंपनीनं संगनमतानं हा निर्णय घेतला आहे. सामंजस्यपूर्ण निर्णय घेऊनच कृति वेगळी झाली आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा' असं ट्विट निर्माती कंपनीनं केलं आहे. 

अभिनेता अर्जुन रामपाल - मेहर जेसिया यांचा घटस्फोट

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत इम्रान हाश्मीदेखील मुख्य भूमिकेत आहे. पहिल्यांदाच बच्चन आणि इम्रान हाश्मी हे एकत्र काम करत आहेत. २१ फेब्रुवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.