पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नटसम्राट'चा तेलगूमध्ये रिमेक होणार?

नटसम्राट

रंगभूमिवरच्या एका महान नटसम्राटाची शोकांतिका म्हणजेच 'नटसम्राट' होय. कुणी घर देता का घर? एका तूफानाला कुणी घर... असं म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध नटाची आयुष्याच्या पटलावरची शोकांतिका वि. वा शिरवाडकरांनी आपल्या लेखणीतून मराठी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आणली. मराठीतल्या अनेक दिग्गज कलाकारांनी आपलं अभिनयातलं कसब पणाला लावून नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अजरामर केली. 

कमल हासन यांच्या 'इंडियन २' मधील दृश्यावर ४० कोटींचा खर्च

या नाटकावर आधारित 'नटसम्राट' नावानं चित्रपटही आला. यात नाना पाटेकर यांनी अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. या चित्रपटाचा तेलगू रिमेक काढण्याचं शिवधनुष्य  दिग्दर्शक कृष्णा वामसी यांनी पेललं असून या चित्रपटात प्रकाश राज प्रमुख भूमिकेत दिसणार असं वृत्त आहे.

सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड 'शेरा'चा शिवसेनेत प्रवेश

चेन्नई एक्स्प्रेस संकेतस्थळाच्या माहितीनुसार  प्रकाश राज हे नटसम्राट साकारणार आहेत तर रम्या कृष्णनन  त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत अशी चर्चा आहे.