पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया भटच्या बेस्टफ्रेंडशी प्रेमसंबंधांच्या चर्चेनंतर के एल राहुल म्हणतो...

के एल राहुल

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते तसे जुनेच. बॉलिवडूमधील अनेक अभिनेत्री क्रिकेटपटूंच्या कामगिरीमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यातील प्रेमसंबंधांची अनेक उदाहरणे आतापर्यंत पाहायला मिळाली आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रींनी क्रिकेटरशी लग्न केल्याचीही उदाहरणे आहेतच. अगदी काही वर्षांपूर्वीच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. इतिहासातही अशी उदाहरणे पाहायला मिळतात. पण यावेळी विषय आहे क्रिकेटपटू के एल राहुल याच्या प्रेमसंबंधाच्या चर्चेचा. गेल्या काही दिवसांपासून राहुलचे नाव वेगवेगळ्या सेलिब्रिटींशी जोडल्या गेल्यामुळे तो चर्चेत आहे. पण यावेळी राहुलने त्याच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेबद्दल मत व्यक्त केले आहे.

... आणि 'मिशन मंगल'चे 'मिशन १०० कोटी'त पदार्पण

के एल राहुल याच्या प्रेमसंबंधांबद्दल अनेक अफवाही पसरविल्या गेल्या आहेत. यामध्ये त्याचे नाव पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा, सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी हिच्याशी जोडले गेले. निधी अग्रवाल हिच्याशीही त्याचे नाव जोडले गेले. पण यावेळी अभिनेत्री आलिया भट हिची जवळची मैत्रिण आकांक्षा रंजन कपूर आणि राहुल यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे काही फोटोही दिसताहेत. 

कलम ३७० वरून ट्रोल झाल्यावर सोनम कपूरने दिले असे उत्तर...

के एल राहुल आणि आकांक्षा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. त्यातच के एल राहुल याच्या एका फोटोवर आकांक्षाने थेट 'लव्ह' असे लिहिल्याने चर्चेला आणखी उधाण आले. या संदर्भात खुद्द राहुल याने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अशा स्वरूपाच्या बातम्या लिहिल्या जात आहेत, असे मला कळले. पण मी पेपर वाचतच नाही. त्यामुळे माझ्याबद्दल काय लिहिले जाते आहे हे मला माहिती नाही. मी माझे वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक ठेवण्यालाच प्राधान्य देतो. मी याला सार्वजनिक चर्चेचा विषय बनवू इच्छित नाही. सध्यातरी माझे सर्व लक्ष क्रिकेटवरच आहे.