पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किआरा दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात

किआरा अडवाणी

नेटफ्लिक्स लवकरच आपला नवा भारतीय चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात किआरा अडवाणीची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं नाव 'गिल्टी' असून किआरा चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता असणार आहे. यापूर्वी लस्ट स्टोरीजसाठी किआरा आणि करणनं एकत्र काम केलं होतं. 

मुस्लिम सून चालते पण जावई नको, सुनैनाच्या प्रियकराचा सवाल

कॉलेजमधल्या विद्यार्थींनींमध्ये प्रसिद्ध असलेल्या मुलावर एका छोट्या शहरातून आलेली मुलगी बलात्काराचा आरोप करते साधरण असं कथानक या चित्रपटाचं असणार आहे. एका मुस्लिम प्रेयसीच्या नजरेतून या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. रुची नारायण या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. रुचीनं  'हजारो ख्वाईशे ऐसी' आणि 'कोलकाता मेल' चित्रपटासाठी पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाबद्दल फारशी माहिती कळू शकली नाही. 

सलमानला पहिला चित्रपट माझ्यामुळे मिळाला- जॅकी श्रॉफ

 किआरा यापूर्वी 'एम एस धोनी', 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या चित्रपटात दिसली. तिची प्रमुख भूमिका असलेला 'कबीर सिंह' गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चार दिवसांत या चित्रपटानं ८० कोटींहून अधिकची  कमाई केली. नुकतेच शाहिद आणि किआरा प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले होते.