पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूल भुलैया २' मध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत

भूल भुलैया २

जवळपास १३ वर्षांनंतर अक्षय कुमार- विद्या बालनच्या 'भूल भुलैया'चा सीक्वल येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे. मात्र मुख्य अभिनेत्रीच्या नावाचा विचार झाला नव्हता. अखेर मुख्य अभिनेत्रीसाठी किआरा अडवाणीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. 

कपिल शर्मा शोमध्ये परतणार? सुनील म्हणतो...

यापूर्वी श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या दोघांच्या नावाची चर्चा 'भूल भुलैया २' साठी होती. श्रद्धा कपूरचं वेळापत्रक व्यग्र असल्यानं तिला तारखा देता आल्या नाहीत. अखेर किआराची वर्णी 'भूल भुलैया २' साठी लागली आहे अशी माहिती मुंबई मिरर या वृत्तपत्रानं दिली. 'लस्ट स्टोरी', 'एम.एस धोनी', 'कबीर सिंह' यांसारख्या चित्रपटात किआरानं काम केलं आहे. ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटातही दिसणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

हॉलिवूड दिग्दर्शकाच्या सेटसमोर भारतीयाचा आत्महत्येचा प्रयत्न

'भूल भुलैया २' च्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यात सुरूवात होणार आहे. २१ जुलै २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख  भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.