पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'केतकीच्या मताशी असहमत पण महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांविरोधात'

केतकी चितळे

अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्यावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगमुळे चर्चेत आली होती. हिंदी भाषेत बोलल्याने तिला सोशल मीडियावर काही युजर्सनं अत्यंत अश्लील भाषेत ट्रोल केलं होतं.  अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना केतकीने जशास तसं उत्तर दिलं होतं. या प्रकरणात केतकीनं मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. तिला करण्यात आलेल्या ट्रोलिंगला ती ज्या धाडसानं सामोरी गेली याबद्दल तिचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं. मात्र तिच्या हिंदी भाषेबद्दलच्या मताविषयी असहमत असल्याचंही  मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं आहे. 

चेक बाऊन्स प्रकरणात अभिजित बिचुकले पोलिसांच्या ताब्यात

'हिंदी राष्ट्रभाषा आहे, तुम्हाला आलीच पाहिजे' ह्या केतकीच्या मताशी आम्ही अजिबात सहमत नाही पण विरोध नोंदवताना महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करणं हि मराठी संस्कृती नाही. तिच्याबरोबर जे घडलं, त्याला ती धीराने-धाडसाने सामोरी गेली. याबद्दल राजसाहेबांनी तिचं अभिनंदन केलं., असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

केतकी चितळे मराठी भाषेत बोलल्यानं काही युजर्सनं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. यावेळी अश्लील भाषेत केतकीवर  काही युजर्सनं टिका केली. यापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनही  सादर केले होते.